सिल्लोडच्या पंचायत समितीसभापती होणार याबाबत उत्सुकता

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यात पंचायत समितीच्या दहा जागांवर दणदणीत विजय मिळवून भारतीय जनता पार्टीने सत्ता काबीज केली. आता कोण सभापती होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

सिल्लोड पंचायत समितीच्या १८ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाने आठ जागांवर विजय मिळविला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या १० विजयी उमेदवारांपैकी ७ठिकाणी महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. यावेळी सिल्लोड पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. 

या विजयी उमेदवारात प्रमुख दावेदार असलेल्या भाजपाचे राज्य सरचिटणीस सुरेश पाटील बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश पाटील बनकर या उंडणगाव पंचायत समिती गणातून २७७५ मतांनी विजयी झाल्या. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर यांची पत्नी वृषाली सुनील पाटील मिरकर यानी धानोरा गणातून २२३९ मतांची आघाडी घेऊन विजय संपादित केला.

 या दोन्ही प्रमुख उमेदवारांपैकी सभापती पदाचा विचार होईल असा अंदाज बांधल्या जात आहे. याशिवाय कोणाच्या नावाला हिरवा कंदील मिळेल हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे ठरवतील. भाजपचे पंचायत समिती गणातील इतर विजयी उमेदवार हळदा गण अनुराधा गणेश गवळे, पानवडोद गण नेहा सुमित खरात, हट्टी गण गजानन सांडू जाधव, केळगाव गण तुळसाबाई अंकुश कोठाळे, पालोद गण तेजस्विनी जगताप, भराडी गण नारायण खोमणे, के-हाळा गण सुमित्रा बनसोड, निल्लोड गण भगवान आहेर.